कूलपॅडचा तीन सिमवाला नोट थ्री एस सादर


चीनी स्मार्टफोन कंपनी कूलपॅडने भारतीय ग्राहकांसाठी आणखी एक चांगला फोन कूलपॅड नोट थ्री एस बाजारात आणला असून या फोनची किंमत आहे ९९९९ रूपये. हा तीन सिम स्लॉटवाला फोन आहे. कूलपॅडने आत्तापर्यंत नोट थ्री ते मेगा थ्री अशा अनेक श्रेणीतील फोन सादर केले असून नोट थ्री एस हा नोट थ्रीचे पुढचे व्हर्जन आहे.

या फोनसाठी ५.५ इंची आयपीएस एचडी २.५ डी कर्व्ह डिस्प्ले, अँड्राईड ६.० मार्शमेलो, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, हायब्रिड सिम कार्ड ट्रेमध्ये एसडी कार्डचा वापर करून मेमरी वाढविण्याची सुविधा दिली आहे. हा फोन अतिवेगवान असून एकाच वेळी त्यात अनेक अॅप वापरणे, गेम खेळणेही शक्य आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करतानाही त्याचा वेग कमी होत नाही तसेच तो गरमही होत नाही. त्याला २५०० एमएएच ची नॉन रिमुव्हेबल बॅटरी दिली गेली आहे. फोनला १३ एमपीचा रियर, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा व मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

Leave a Comment