लावाचा भारतातला पहिला फोर जी फिचरफोन सादर


स्थानिक मोबाईल कंपनी लावाने त्यांचा नवा फिचर फोन लावा फोरजी कनेक्ट एम वन लाँच केला असून भारतातला हा पहिलाच फोर जी फिचर फोन असल्याचा दावा केला आहे. हा फोन व्हॉईस ओव्हर एलटीई फिचर सपोर्ट करेल म्हणजेच यात रिलायन्स जिओचे सिमकार्ड वापरता येणार आहे. रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहक विस्तारासाठी १५०० रूपयांचा फिचर फोन सादर करण्याच्या विचारात असतानाच हा फोन लावाने बाजारात आणला असून त्याची किंमत ३३३३ रूपये आहे.

लावाने या फोनसाठी २.४ इंची डिस्प्ले, ५१२ एमबी रॅम, ४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, व्हीजीए कॅमेरा दिला असून फेसबुक लाईट व मेसेजिंग अॅप इन्स्टॉल केली आहेत. शिवाय वायरलेस एफएम, ब्ल्यू टूथची सुविधाही आहे. कंपनीचे प्रॉडक्ट हेड गौरव निगम यांच्या मते हा स्वस्त हँडसेट युजरला डिजिटल कनेक्टचा आनंद देईल तसेच डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्याची सुविधाही पुरवेल.

Leave a Comment