पुढील काही दिवस माथेरान बंद


मुंबई – आजपासून मुंबईकरांचे थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान बेमुदत बंद राहणार आहे. २००३ ला माथेरानमध्ये इको सेन्सेटिव्ह झोन लागू करण्यात आल्याने नव्याने बांधकाम करण्यावर निर्बंध आली आहेत. त्यातच माथेरानचा विकास आराखडा शासन दरबारी प्रलंबित आहे आणि याच दरम्यान माथेरानच्या नागरिकांनी आपल्या घरांची बांधकामे केली आहेत.

हरित लवादाकडे ‘बॉम्बे एन्व्हायरमेंट अॅक्शन ग्रुप’ या सामाजिक संस्थेने नुकतीच माथेरानच्या नागरिकांनी जी बांधकामे केली होती त्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि लवादाने २००३ नंतर केलेली सर्व बांधकामे पाडण्याचा निर्णय दिला आहे. आज पोलीस बंदोबस्तात बांधकामे पाडण्याचे काम सुरु होणार आहे त्या विरोधात माथेरान संघर्ष समितीकडून माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय माथेरान गावकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे पर्यटकांना पुढील काही दिवस माथेरानला जाणं शक्य होणार नाही. याचा परिणाम पर्यटकांवर आणि पर्यायाने तेथील रोजगारावर पडणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी नोंद घ्यावी जेणे करून त्यांच्या प्लानमध्ये कोणतंही व्यत्यय येणार नाही.

Leave a Comment