कश्मीरवरुन कन्याकुमारीला फक्त १.२० सेकंदात पोहचवणार सोलार एक्सप्रेस


नवी दिल्ली : कॅनडाची एक इनोवेटिव फर्म चार्ल्स बॉम्बार्डियर मनाच्या गतीपेक्षा वेगाने धावणारी एक्सप्रेसवर काम करत असून भविष्यात एक अशी सोलार एक्सप्रेसची कल्पना कंपनीने केली आहे, जी धरतीवरुन अंतराळात फेरी मारेल. या एक्सप्रेसला पृथ्वीवरुन मंगळावर पोहोचण्यासाठी फक्त २ दिवस लागणार आहे, तर कश्मीरवरुन कन्याकुमारीला जाण्यासाठी ही ट्रेन फक्त १.२० सेकंड घेईल.

ही सिलेंडरची एक सीरीज असेल. कमीत कमी ५० मीटर प्रत्येक सिलेंडरची लांबी असणार आहे. एक ट्रेनमध्ये असे ६ सिलेंडर असतील. याची संपूर्ण लांबी ३०० मीटर असेल. प्रत्येक सिलेंडर चार भागात वाटलेला असेल. ही विशेष सोलार एक्‍सप्रेस गुरुत्वाकर्षणचा वापर करणार आहे. याच्या मदतीने ती धरती आणि अंतराळात फेरी मारेल. इंडस्ट्रीयल इंजीनियर ओलिविएर पेरैल्डी नावाच्या कंपनीने या इंजिनचे डिजाइन विकसित केले आहे. या ट्रेनमध्ये तारही बाजुला एक सोलार पट्टी असेल ज्याच्या ऊर्जेवर ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन सुरु झाल्यानंतर तिची गती शेवटच्या स्थानाच्या आधी कमी होणार नाही.

Leave a Comment