बाहुबली २ नंतर आला राजकीय रईस २चा ट्रेलर


सध्या बॉक्सऑफिसवर बॉलिवूड किंग शाहरूख खान याचा ‘रईस’ चित्रपट चांगली कमाई करत आहे.गल्लोगल्ली लोकांच्या तोंडून चित्रपटातील त्याचे डायलॉग ऐकायला मिळत आहे. केवळ त्याचे चाहतेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवदेखील ‘रईस’मधील डायलॉग बोलताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने अर्थात अखिलेश यांचे डायलॉगही निवडणुकीचेच आहेत. त्याचे झाले असे की, ‘रईस’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बदल करत अॅनिमेटर फैजान सिद्दीकीने त्यात शाहरुखऐवजी अखिलेश यादव यांना दाखवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. विविध माध्यमांद्वारे घेतलेल्या दृश्यांच्या सहाय्याने अखिलेश, त्यांची पत्नी डिंपल, पंतप्रधान मोदी, काका शिवपाल यादव आणि अन्य लोकांचा या ट्रेलरमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील या ‘रईस’चा ट्रेलर चांगलीच ‘दंगल’ करत आहे.

Leave a Comment