नसबंदीला नवा पर्याय


मुंबई – गर्भनिरोधनासाठी पुरूषांकडे सध्या कंडोम आणि नसबंदी हे दोन मार्ग उपलब्ध असून पण आता असे एक पुरुषांसाठी गर्भनिरोधकाचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ज्याची यशस्वी चाचणी माकडांवर घेण्यात आली आहे. शुक्राणुंच्या प्रवाहाला व्हेसलक्रिमद्वारे थांबवता येऊ शकते असे या चाचणीतून दिसून आले आहे.

ज्या नलिकेद्वारे पुरूषांच्या शरीरातील शुक्राणू लिंगापर्यंत जातात त्या नलिकेत व्हेसलक्रिम टाकली जाते. माकडांवर दोन वर्ष परीक्षण केल्यानंतर ही क्रिम योग्य कार्य करत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबतचे वृत्त बीबीसीने दिले आहे. या क्रिमचा वापर काही वर्षांमध्ये पुरुषांसाठी केला जाऊ शकतो असा दावा क्रिम निर्मात्या कंपनीने केला आहे. या क्रिमला कायद्याची मंजुरी मिळाली तर व्हेसलजेल हे क्रिम स्वरुपातील पहिले पुरूष गर्भनिरोधक ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment