अॅमेझॉन भारतात स्वतःची रिटेल कंपनी स्थापणार


ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतात स्थानिक पातळीवर फूट आयटेम स्टॉक करण्यासाठी स्वतःच्या मालकीची कंपनी स्थापून त्या द्वारे ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या साठी कंपनीने केंद्र सरकारकडे ५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करून व्हेचर सुरू करण्यासाठी अर्जही केला आहे. हे घडले तर अॅमेझॉन या सेगमेंटमधील पहिली परदेशी कंपनी ठरणार आहे.

सध्या भारतात अॅमेझॉन ई कॉमर्स मार्केट प्लेस ऑपरेट करत आहे. यासाठी १०० टकके एफडीआय म्हणजे परदेशी गुंतवणूकीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र अॅमेझॉन सध्या स्वतः विक्री करू शकत नाही त्यासाठी स्वतःच्या मालकीचे व्हेंचर असणे आवश्यक आहे. म्हणून ५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक पुढील पाच वर्षात करून सरकारकडून व्हेंचरसाठी परवानगी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर सहा महिन्यात स्थानिक उत्पादनांची विक्री अॅमेझॉन करू शकेल असे समजते.

Leave a Comment