रीगल रॅप्टर बाईक वाढविणार हैद्राबाद पोलिसांचा वेग


हैद्राबाद पोलिसांना लवकरच दमदार व डिझायनर बाईक्स दिल्या जाणार असून या रीगल रॅप्टर सुपरबाईक्स हैद्राबाद पोलिसांच्या वेगाला गती देण्यात मोलाचे सहकार्य करणार आहेत. सध्या या बाईक्सची विक्री फॅब ग्रुपतर्फे केली जात आहे.

पोलिसांना पुरविल्या जाणार्‍या फॅब रिगल रॅप्टर पोलिस लेगसी मॉडेलच्या या बाईक्स खास प्रोटेक्शन फोर्ससाठी डिझाईन केल्या आहेत. त्यात सुरक्षा कामांसाठी उपयुक्त अशी अनेक फिचर्स दिली गेली आहेत. इंटिग्रेटेड वायरलेस पीए सिस्टीम, जीपीएस, सीसीटिव्ही फूटेज दाखविण्याची सुविधा, पोलिस कंट्रोलरूमशी कनेक्ट राहण्याची सुविधा आहे. यामुळे जरूर पडताच त्वरीत बाईकवरील पोलिसांशी संपर्क साधला जाऊ शकणार आहे.

या बाईक बाँबनिकामी दल, अग्नीशमन दल, वाहतूक पोलिस पेट्रोलिंग पथके यांच्या वापरासाठी सक्षम आहेत तसेच हायवे इमर्जन्सी व व्हीव्हीआयपी एक्सॉर्टसाठीही त्यांचा वापर होऊ शकणार आहे. बाईकसोबत फर्स्टएड बॉक्स, डिस्क ब्रेक, दोन्ही बाजूला लॉकेबल साईड बॉक्स दिले गेले असून या बाईकला सात वर्षांची वॉरंटी आहे.

Leave a Comment