आरोग्यासाठी घातक आहे सतत पोस्ट टाकणे आणि लाईक करणे


मुंबई : एका अभ्यासातून फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणे आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणे या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचे समोर आले आहे. यासंबंधीची आकडेवारी कॅलिफोर्निया विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. या अभ्यासासाठी सरासरी ४८ वर्षांच्या ५२०० लोकांचा अभ्यास करण्यात आला.

कॅलिफोर्निया विद्यापीठानं केलेल्या या संशोधनात सहभागींनी त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे मापन १ ते ४मध्ये नोंदवले. तर लाईफ सॅटिस्फॅक्शन १ ते १० मध्ये नोंदवले. तसेच बॉडी मास इंडेक्सचीही माहिती दिली. या संशोधनात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांचा फेसबुकचा डेटा वापरण्याची परवानगीही संशोधकांना दिली होती. यामुळे संशोधनात सहभागी असलेल्या लोकांच्या फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्याच्या सवयी आणि इतरांच्या पोस्ट लाईक करण्याची सवय याचा शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करता आला. या संशोधनात सतत फेसबुकवर स्टेटस अपडेट करणे आणि इतरांच्य़ा पोस्ट लाईक करणं यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो असा निष्कर्ष काढण्यात आला.

Leave a Comment