१२ अॅप प्ले स्टोअरवरून हटवा; केंद्र सरकारच्या सूचना


नवी दिल्ली – आधारची सुरक्षा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या १२ अँड्राईड अॅप्लिकेशन्समुळे धोक्‍यात असल्याने ही अॅप्स स्टोअरवरून हटविण्याच्या सूचना सरकारने दिल्या असून सरकारने अशा प्रकारे गुगलला सूचना देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात असून, आधारमार्फत (यूएडीएआय) सरकारने याबाबत गुगलला कळविले आहे.

सरकारने २०१६च्या आधार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेकायदा आणि फसव्या कंपन्या बंद करण्याचे ठरविले आहे. यानुसार १२ संकेतस्थळे, १२ स्मार्टफोन अॅप्स आणि अशा २६ आणखी बेकायदा आणि फसव्या संकेतस्थळांसह अॅप्लिकेशन्सही बंद करण्याचे ठरविल्याचे अहवालावरून समजते.

या कंपन्या परवाना नसताना आणि अवाजवी किंमत लावून आधारसंदर्भातील काही सेवा देत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आधार कार्ड डाउनलोड करणे आणि अन्य माहिती पुरविणे यासाठी पैसे आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या खोट्या कंपन्यांच्या आणि त्यांच्या अॅपच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Leave a Comment