ही आहे जगातील सर्वाधिक वेगवान बाईक


आज जगात अनेक कंपन्यांनी त्याच्या महागड्या व वेगवान बाईक्स सादर केल्या असल्या तरी अजूनही सर्वात महागडी व वेगवान बाईक म्हणून डॉज टॉमहॉक्स हीच बाईक ओळखली जाते. जगभरात हिच्याइतक्या प्रचंड वेगाने जाणारी अन्य दुसरी बाईक नाही. मोटरबाईक हा वाहन प्रकार टू व्हीलर सेगमेंटमध्ये मोडत असला तरी डॉज टॉमहॉक्सची खासियत म्हणजे हिला चार टायर दिले गेले आहेत.

ही बाईक अवघ्या १ ते दीड सेकंदात १०० किमीचा वेग पकडते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ६७५ किमी. बाईकची किंमत आहे ३ ते चार कोटी रूपये. ही बाईक वास्तविक २००३ सालीच बाजरात आली असली तरी आत्तापर्यंत या लग्झरी बाईकची ९ ते १०च युनिट जगभरात विकली गेली असल्याचेही सांगितले जाते. या बाईकला ८.३ लिटर व्ही १० एसआरटी १० डोज वायपर हे इंजिन दिले गेले आहे.