नवी दिल्ली: सीबीएसईच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आणखी एका परीक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. राष्ट्रीय चाचणी मंडळ ( नॅशनल टेस्टिंग एजन्सी) असे या मंडळाचे नाव असणार आहे; अशी माहिती या विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
लवकरच आणखी एका परीक्षा मंडळाची स्थापना
या मंडळामार्फत सुरुवातीला आयआयटी, एनआयटी अशा उच्च शिक्षणाच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार असून कालांतराने सीबीएसईच्या धर्तीवर उच्च माध्यमिक परीक्षा घेतली जाणार आहे.
शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे हे सीबीएसईच्या स्थापनेचे उद्दीष्ट आहे. उच्च शिक्षणात असेच बदल घडविण्यासाठी एनटीए स्थापन करण्यात येणार आहे. या विभागात प्रथम सीबीएसीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असून कालांतराने या विभागात तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल; असेही जावडेकर यांनी सांगितले.