जगातील सर्वाधिक अंतराच्या फ्लाईटचे उड्डाण


जगातील सर्वात लांब अंतराच्या कतार एअललाईन्सच्या क्यू आर ९२० दोहा ते ऑकलंड या फ्लाईटचे पहिले उड्डाण रविवारी सायंकाळी पाच वाजता झाले असून ती सोमवारी सकाळी ७ वा.३० मिनिटांना ऑकलंडला पोहोचणार असल्याचे कतार एअरलाईन्सने जाहीर केले आहे. ही फ्लाईट या वेळात पाच देश व दहा टाईम झोन पार करणार असून १४५३५ किमीचा प्रवास सोळा तासात पूर्ण करणार आहे.

या प्रवासी फ्लाईटमध्ये प्रवाशांची संख्या जाहीर केलेली नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार यात चार पायलट व १५ क्रू मेंबर आहेत. गतवर्षी मार्चमध्ये एमिरेटस एअरलाईन्सच्या दुबई ते ऑकलंड या नॉनस्टॉप फ्लाईटने जगातील सर्वाधिक अंतराची फ्लाईट म्हणून रेकॉर्ड नोंदविले होते. या फ्लाईटने एकाच उड्डाणात १४२०० किमीचे अंतर पार केले होते.

Leave a Comment