मुंबई – आयकर विभागाने मुंबईतील २० जणांच्या संपत्तीवर नव्या बेनामी संपत्ती प्रतिबंधक कायद्याचा वापर करुन टाच आणली असून या प्रकरणातील संशयितांनी आपल्या बॅंक खात्यांचा वापर संदिग्ध वापरासाठी केला होता. जाहीर उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम ज्या लोकांच्या खात्यांमध्ये जमा आहे आयकर विभागाने त्यांची संपत्ती देखील जप्त केली आहे. या संशयितांना २७ जानेवारीला बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई झाली असे सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की ज्या लोकांनी बेनामी व्यवहार केले आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी आणि त्यांच्यावर पुढील कारवाई व्हावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास दंड आणि जास्तीत जास्त ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.