गुगलने यंदाच्या वर्षात प्रतिस्पर्धी टेक कंपनी अॅपलला मागे टाकत जागतील सर्वाधिक मौल्यवान व लोकप्रिय ब्रँडचा खिताब मिळविला आहे. यंदाच्या वर्षात गुगल सर्वाधिक विश्वासार्ह व मौल्यवान ब्रँड ठरल्याचे ब्रँड फायनान्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार गुगलची ब्रँड व्हॅल्यू २०१७ मध्ये १०९.४ अब्ज डॉलर्स म्हणजे ७१९४ अब्ज रूपये झाली असून २०११ पासून अॅपलकडे नंबर वन ब्रँडचे स्थान होते ते आता गुगलने मिळविले आहे.
अॅपल नव्हे, गुगल ठरला २०१७ चा लोकप्रिय ब्रँड
गतवर्षीच्या तुलनेत गुगलच्या ब्रँड व्हॅल्यूत २४ ने वाढ झाली आहे. गतवर्षी ही व्हॅल्यू ८८.२ अब्ज डॉलर्स होती. गेल्या वर्षात अॅपलने आयफोन सेव्हन, प्लस लाँच केले तरीही त्यांची ब्रँड व्हॅल्यू १४५.९ अब्जांवरून १०७ अब्ज डॉलर्सवर घरसली आहे. ब्रँड फायनान्सचे सीईओ डेव्हीड हे यांच्या म्हणण्यानुसार अॅपलची जनमानसतातील विश्वासाहर्ता कमी झाल्याचे हे लक्षण आहे. तसेच अॅपलकडून ग्राहकांचा अपेक्षाभंग होत असल्याचेही निदर्शन आहे. या यादीत अॅमेझॉन १०६ अब्ज डॉलर्स ब्रँड व्हॅल्यूसह तीन नंबरवर असून त्यापाठोपाठ एलटी अॅन्ड टी, मायक्रोसॉफ्ट व सॅमसंग यांचा नंबर आहे.