उदयपुर – भारताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जारी केलेली शंभराची नोट ही एखाद्या पोस्टल ऑर्डरप्रमाणे होती. ती आज असलेल्या शंभराच्या नोटीपेक्षा आकाराने दुप्पटी होती, अशी माहिती महेश जैन यांनी दिली आहे. जैन यांच्याकडे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आतापर्यंतच्या शंभर रुपयांच्या सर्व नोटा आहेत.
शंभर रुपयांची पहिली नोट, असे झाले बदल
जैन यांच्याकडे सात प्रकारच्या 100 रुपयांच्या नोटांचा संग्रह आहे. यात स्वातंत्र भारताचे दुसरे भारतीय आरबीआयचे गर्व्हनर सर बेनेगल रामा राव यांच्यापासून सध्याचे गर्व्हनर उर्जित पटले यांच्या वर्ष 2016पर्यंत झापलेल्या अनेक नोटा आहेत.
पहिली नोट ः आरबीआयने शंभर रुपयांची पहिली नोट 9 जानेवारी 1950 रोजी जारी केली होती. पोस्ट कार्डच्या आकाराहून जरा मोठी असलेल्या या नोटीवरील प्रथमदर्शनी भागावर अशोक स्तंभ आणि मागील भागावर दोन हत्तींचे चित्र होते. निळ्या (मल्टी) रंगात असलेल्या या नोटीवरील नंबर हा काळ्या रंगात लिहिण्यात आला होता. ती पूर्णपणे इंग्रजीत जारी करण्यात आली होती.
दुसरी नोट ः बैंगणी आणि मल्टी कलर असलेली दुसरी नोट 26 डिसेंबर 1959 जारी करण्यात आली होती. तिच्यावर खाली आणि वरच्या भागावर लाल रंगात अक्षरे आणि मागील भागावर हीरा कुंड धरण आणि हायड्रो इलेक्ट्रॉनिक स्टेशनचे चित्र होते.
तिसरी नोट ः या नोटीवरील 100 हा अंक डायमंडसारख्या आकारात लिहिण्यात आला होता. ही नोट 17 एप्रिल 1967 रोजी जारी करण्यात आली होती.
चौथी नोट ः या नोटीवर पहिल्यांदा महात्मा गांधी यांचे चित्र छापण्यात आले. निळा, पिवळा आणि मल्टिकलर असलेली ही नोट 2 ऑक्टोंबर 1969 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यातील पांढर्या पट्टीत पहिल्यांद महात्मा गांधी यांचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले.
पाचवी नोट ः निळा, राखाडी आणि मल्टिकलर असलेली ही नोट 26 मार्च 1775 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या नोटीवरील मागील भागावर भारतातील कृषी प्रधानता दाखविण्यात आली होती.
सहावी नोट ः निळा, गुलाबी आणि मल्टिकलरमधील ही नोट 31 डिसेंबर 1979 रोजी जारी करण्यात आली. यावर गव्हर्नर यांचे हस्ताक्षर लाल रंगात होते.
सातवी नोट ः निळा, हिरवा आमि मल्टीकलरमधील ही नोट गर्व्हनर सी. रंगराजन यांनी 2005मध्ये जारी केली. यावर पुढील भागावर पहिल्यांदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्पष्ट चित्र, तर मागील भागावर हिमालय पर्वत प्रसिद्ध करण्यात आले.