१०० ची नवी नोट लवकरच


नोटबंदी नंतर रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या पाचशे व दोन हजार रूपयांच्या नव्या नोटांनंतर आता १०० रूपयांची नवी नोटही लवकरच चलनात आणली जात असल्याची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने जारी केली आहे. या नोटा म.गांधी सिरीज २००५ नुसार आहेत व त्या चलनात आल्यानंतर टप्प्याटप्याने २००५ पूर्वीच्या १०० च्या नोटा चलनातून काढून घेतल्या जाणार आहेत.

नव्या १०० च्या नोटेवर नंबर पॅनल मध्ये इनसेट लेटर आर असेल व गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही व प्रिटींग वर्ष २०१७ असेल. प्रचलित नोटेपेक्षा ही नोट आकाराने थोडी लहान असणार आहे. रिझर्व्ह बँक ५० व २० रूपयांच्या नव्या नोटाही चलनात आणत आहे.

Leave a Comment