फ्री इंटरनेटमुळे फेसबूक तेजीत


मुंबई : फेसबूकला रिलायन्स जिओने दिलेल्या फ्री इंटरनेटचा जबरदस्त फायदा झाला असून फेसबूकचा वापर डिसेंबरच्या तिमाहीत वाढल्याची माहिती समोर आली आहे, आणि ही वाढ भारतातून झाल्याची प्रतिक्रिया फेसबूककडून देण्यात आली आहे. भारतातून झालेली ही वाढ विक्रमी असल्याचेही फेसबूकने सांगितले आहे. यंदाच्या तिमाहीत आशियातून मन्थली यूजर्सनी ४४ दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे. फेसबूकचे भारतामध्ये १९ कोटी ५० लाख यूजर्स आहेत. भारतानंतर अमेरिकेचे १९ कोटी १० लाख यूजर्स आहेत.

Leave a Comment