अजब रेल्वे स्टेशन भवानी मंडी


भारतात रेल्वेचे जाळे अधिक विस्तारीत करण्याचे व रेल्वे सेवेमध्ये अभूतपूर्व परिवर्तन करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. मात्र देशातील काही अजब रेल्वे स्टेशन तशीच राहणार आहेत. यातील एक आहे भवानी मंडी. या स्टेशनचे वैशिष्ठ म्हणजे ते दोन राज्यांच्या सीमेत येते. या स्टेशनवर राज्य सीमांचा बोर्डही लावला गेला आहे.

या स्टेशनवर रेल्वे गाडी उभी राहिली की तिचा अर्धा भाग राजस्थानात तर अर्धा भाग मध्यप्रदेशात येतो. त्यामुळे एकाच गाडीतील निम्मे प्रवासी एकाचवेळी राजस्थानान व निम्मे मध्यप्रदेशात असतात. राजस्थान राज्याच्या हद्दीतल्या प्रवाशांना अनेकदा मध्यप्रदेशात जाऊन स्टेशनवरचे पाणी प्यावे लागते तर चहा समोसे असे खाद्यपदार्थ विकणारे कितीतरी वेळा एका राज्यातून दुसर्याा राज्यात जात असतात. या स्टेशनचा दक्षिण भाग राजस्थानच्या झालवाड जिल्ह्यात येतो तर उत्तर भाग मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात येतो.

Leave a Comment