आयफोन तसेच टचस्क्रीन फोन लोकप्रिय होण्यापूर्वी स्मार्टफोन क्षेत्रात अधिराज्य गाजविणार्या ब्लॅकबेरी ब्रँडचे फोन भारतीय टेलिकॉम कंपनी ऑप्टिमस इंफ्राकॉम बाजारात आणणार आहे. दिल्लीच्या ऑप्टिमस कंपनीने कॅनेडियन कंपनी ब्लॅकबेरीबरेाबर त्यासाठी १० वर्षाचा करार केला असून त्या नुसार या ब्रँडचे लायसेन्सिंग अॅग्रीमेंट केले गेले आहे. यापूर्वीही ही कंपनी ब्लॉकबेरीचे मोबाईल्स व अॅक्सेसरीज वितरण करत होती. नव्या कराराने ऑप्टिमसला या ब्रँडचे डिझायनिंग, उत्पादन व विक्रीचे अधिकार मिळाले आहेत.
भारतीय ऑप्टीमस तयार करणार ब्लॅकबेरी स्मार्टफोन
ऑप्टीमस भारतात तसेच शेजारी देशात ब्लॅकबेरीसाठी कस्टमर सपोर्टही देणार आहे. यासाठी कंपनीने भारतीय बाजारात १२ ते २० हजार रूपये किंमतीमधील हँडसेटवर फोकस केला आहे कारण भारतात याच सेगमेंटमधील सर्वाधिक स्मार्टफोन विकले जात आहेत. देशात एका वर्षात २० लाख हँडसेट विक्रीचे कंपनीचे उदिष्ट आहे. गुगल अँड्राईड ओएसवर चालणार्या या फोनना थेट ब्लॅकबेरीकडून सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे. गेल्या नोव्हेंबरपर्यंत हीच कंपनी भारतात ब्लॅकबेरीचे वितरण करत होती. कंपनीने सध्या तैवानच्या विस्ट्रॅान कार्पोरेशनबरोबर उत्पादन करार केला आहे.