बाजारात येणार टाटाची पहिली स्पोर्टस् कार


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपली पहिली स्पोर्टस् कार लवकरच लाँच करणार असल्याचे भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने सांगितले आहे. ‘फ्युचरो’ असे या नव्या स्पोर्टस् कारचे नाव ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या नव्या स्पोर्टस् कारमध्ये नवा ब्रँड ‘टॅमो’च्या अंतर्गत विक्रीच्या तयारीत आहे. या स्पोर्टस् कारला एक्सक्युझिव्ह म्हटले असून या मॉडेलची २५० युनिटस् बनवण्यात येणार आहे. या कारची किंमत २५ लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. या कारची किंमत कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला. तसेच सध्यातरी कंपनीने या कारच्या इंजिनबाबत माहिती दिलेली नाही. तरी ‘ऑटो कार’ च्या अहवालानुसार या कारमध्ये टर्बोचार्ज्ड १.२ रेवॉट्रन इंजिन देण्यात आले असून तो १८०बीएचपीची पॉवर जनरेट करु शकतो, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.