झेडटीईचा ब्लेड ए टू प्लस भारतात


झेडटीईने त्यांचा ब्लेड ए टू प्लस स्मार्टफोन भारतात लाँच केला असून सोमवारपासून तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत ११९९९ रूपये आहे. चीनमध्ये कंपनीने हा फोन ३ व ४ जीबी अशा दोन व्हर्जन मध्ये सादर केला आहे मात्र भारतात तो फक्त ४ जीबी रॅममध्येच मिळणार आहे.

या फोनसाठी ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन दिला गेला आहे. ४ जीबी रॅमसह माली टी ८६० जीपीयू आहे. इंटरनल मेमरी ३२ जीबी व मायक्रोकार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, हायब्रिड ड्युअल सिम, अँड्रईड मार्शमेलो ६.० वर आधारीत मिफाव्होर ३.५ ओएस,१३ एमपीचा ड्युअल फ्लॅश रियर कॅमेरा, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा व ५ हजार एमएएचची बॅटरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी फोर जी,एलटीई, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस सपोर्ट अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment