जगातील सर्वाधिक कोट्याधीश असलेले मोरोको


जगात आज जेवढी शहरे आहेत त्यात काही प्रमाणात कोट्याधीश नागरिक रहात आहेतच. पण लोकसंख्येच्या मानाने जगात सर्वाधिक कोट्याधीश असलेले शहर म्हणून फ्रान्सला लागून असलेल्या मोरोको सिटीचा पहिला नंबर असून या शहरात दर तीन नागरिकांमागे १ कोट्याधीश आहे. एका सर्वेक्षणात ही बाब नजरेस आली आहे.

श्रीमंत शहरांसंदर्भात केलेल्या या सर्वेक्षणात मोनोको ३१.१ टक्के कोट्याधीश संख्येने आघाडीवर आहे. लंडन शहराचा या यादीत चौथा क्रमांक आहे. मोनोकोची एकूण लोकसंख्या ३८ हजार असून त्यात १३ हजारांहून अधिक कोट्याधीश आहेत. अन्य युरोपिय देशांतील शहराच्या तुलनेत मोरोकोतील नागरिकांची कमाई अतिवेगाने वाढते आहे. जगात या शहराचा जीडीपी सर्वाधिक असून येथील जागांच्या किमतीही न्यूयॉर्क
सिटीतील किमतींपेक्षा दुप्पट आहेत.

Leave a Comment