सेल्फी काढा एअर सेल्फी ड्रोनने


सेल्फी क्रेझींसाठी एक चांगली बातमी आहे. सेल्फी स्टिकशिवाय, हव्या त्या जागी, हव्या त्या पोझमध्ये सेल्फी काढण्याची सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध झाली आहे. यासाठी एअरसेल्फी ड्रोन बाजारात आणले जात असून हा मोबाईलच्या आकाराचा ड्रोन कॅमेरा आहे. यामुळे एअरसेल्फी काढता येतीलच पण सेल्फी काढताना हाताची जी एक ऑकवर्ड पोझिशन करावी लागते तीही करावी लागणार नाही. या एअरसेल्फी ड्रोनची किंमत १७५३० रूपये असून तो लवकरच बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे.

या ड्रोनला ५ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. हे ड्रोन २० मीटर उंचीवरूनही झूम करून चांगल्या सेल्फी काढू शकते. याच्या सहाय्याने मोठ्या रेंजमध्येही सेल्फी घेता येतात. हे ड्रोन वायफायशी कनेक्ट होते. उडण्यासाठी तसेच फोटो क्लिक करण्यासाठी त्याला पॉवरफुल बॅटरी दिली गेली आहे व ४ जीबीचे स्टोरेजही आहे. ही बॅटरी ३० मिनिटात चार्ज करता येते. यातून घेतलेल्या सेल्फी एअरसेल्फी स्टोरेजमध्ये जमा होतात व वायफायच्या सहाय्याने स्मार्टफोनवर ट्रान्सफर करता येतात. अॅल्युमिनियमपासून बनविलेल्या या ड्रोनचे वजन फक्त ५२ ग्रॅम आहे. आयफोन ७, प्लस, सिक्स एस, गुगल पिक्सल, सॅमसंग गॅलेक्सी एज मध्ये हे ड्रोन फिट होते.

Leave a Comment