या डॉक्टरने केल्या विक्रमी ३.५ लाख नसबंदी


इंदौर – दूरबीनवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले विशेषतज्ज्ञ डॉ. ललितमोहन पंत यांनी मागील 35 वर्षांमध्ये सुमारे 3.5 लाखांहून अधिक नसबंदी केल्याचा दावा केला आहे. पंत म्हणाले, मी आतापर्यंत 3,54,426 पुरूष आणि महिलांच्या नसबंदीचे ऑपरेशन केले आहे. जगातील कोणत्याही डॉक्टरने किंवा सर्जनने आजपर्यंत एवढी ऑपरेशन केले नसतील, असा दावा त्यांनी केला आहे.

मध्य प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या 61 वर्षीय सर्जन डॉ. पंत यांनी पहिले नसबंदीचे ऑपरेशन 1982मध्ये केले. तसेच मध्य प्रदेश आणि दिल्लीत आयोजित कुटुंब नियोजन शिबिरांमध्येही त्यांनी नसबंदीचे ऑपरेशन केलेले आहेत. डॉ. पंत म्हणाले, सांख्यिकिय अनुमानानुसार एक नसबंदीचे ऑपरेशन केल्यास 2.7 संभावित जन्म रोखले जाऊ शकतात. या हिशोबाने 3,54,426 ऑपरेशनमुळे आतापर्यत सुमारे साडेनऊ लाख संभावित जन्म रोखले आहेत.

मध्य प्रदेशातील गावांमध्ये पंत यांना दूरबीनवाले बाबा या नावाने लोक ओळखतात. कारण महिलांच्या नसबंदी ऑपरेशन करण्याच्या पद्धतीत त्यांना चांगला हातखंडा असून यामध्ये दूरबीन हा शब्द जोडलेला आहे. त्यांच्या मते, मागील काही वर्षांमध्ये विना चिरफाड, विना टाकांच्या ऑपरेशन पद्धतीमुळे पुरुषांच्या नसबंदी करण्याच्या मानसिकतेत बदल होत आहे. मात्र, महिलांच्या तुलनेत पुरुषांचे नसबंदी करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. पंत यांनी सांगितले की, 3,54,426 नसबंदीमध्ये फक्त 12,600 पुरुषांची मी नसबंदी केली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment