भारतीय कंपन्यांनी एचवन बी व्हिसा घेऊच नये- नारायण मूर्ती


भारतीय आयटी कंपन्यांनी एचवन बी व्हीसापासून दूर राहावे व भारतीयांना या व्हिसावर अमेरिकेत पाठविण्यापेक्षा तेथील स्थानिक लोकांनाच नोकरीवर ठेवावे असे मत इंन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले आहे. ट्रंप यांच्या एचवन बी व्हीसा पॉलिसीसंदर्भात ते बोलत होते. ट्रंप यांचा हा निर्णय भारतीय आय टी कंपन्या व भारतीय प्रोफेशनल्ससाठी चिंतेचा विषय बनला आहे.

मूर्ती म्हणाले मल्टीनॅशनल कंपनी बनण्यासाठी एचवन बी व्हिसाचा वापर हाच एक मार्ग नाही. भारतीयांनी सोपे रस्ते निवडण्याची मानसिकता बदलायला हवी. त्यामुळे या पुढे भारतीय कंपन्यांनी एचवन बी व्हिसाचा वापर थांबविण्यावर भर दिला पाहिजे व तेथील स्थानिकांना नोकर्‍यात समावून घेतले पाहिजे. केवळ यूएस मध्येच नाही तर कॅनडा, ब्रिटनमध्येही तेथील स्थानिकांना नोकरी देण्यावर भर दिला पाहिजे. अमेरिकन प्रशासनाच्या निर्णयाकडे आपण एक संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि भारतीयांशिवाय अन्य देशवासियांबरोबर काम करण्यास शिकले पाहिजे तरच आपले स्थान आपण अबाधित राखू शकू असेही ते म्हणाले.

Leave a Comment