बंद होणार तुमचे जीमेल


नवी दिल्ली – आपली ई-मेल सर्व्हिस कंपनी Gmail संदर्भात जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगलने एक महत्वाची घोषणा केली असून या वर्षाच्या शेवटपर्यंत क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार आहे. क्रोम बाउजरच्या जुन्या व्हर्जनसोबतच विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा या ऑपरेटिंग सिस्टिमवर जीमेल वापरण्यांवर याचा परिणाम होईल.

या वर्षाच्या शेवटपर्यंत जीमेल सपोर्ट सुरू असेल मात्र, त्यानंतर जुन्या व्हर्जनवर बंद होईल अशी घोषणा गुगलने केली आहे. गुगलच्या मते, ८ फेब्रुवारी २०१७ पासून युझर्सला नोटीफिकेशन्स दिले जातील. क्रोम व्हर्जन ५३ किंवा त्याहून जुने व्हर्जनचे ब्राऊझर वापरणा-यांना ८ फेब्रुवारी २०१७ पासून नोटीफीकेशन्स दिले जाणार आहेत. या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टाच्या युझर्सवर होणार आहे.

सिक्युरिटी अपडेट जुन्या ओएस किंवा ब्राऊझरमध्ये मिळत नसल्यामुळे त्यांना हॅक करणे सोपे असते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. गुगल आपल्या जुन्या ओएस ब्राऊझरहून नव्या अपडेटेड व्हर्जनकडे जाण्यास युझर्सला सांगत आहे.

गुगलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर युजर्स आपल्या जुन्या क्रोम व्हर्जनमध्ये जीमेल वापरत असतील तर हॅकींगचा समस्या अधिक निर्माण होते. त्याचप्रमाणे एक्सपी आणि विस्टाबाबतही असचं आहे त्याचा सपोर्ट आता मायक्रोसॉफ्टने बंद केला आहे.

Leave a Comment