९५ कोटींची लिमोसीन ब्रुनेई सुल्तानाच्या तैनातीत


लग्झरी लाईफ म्हटले की बुनेईचे सुल्तान हसनल यांचे नांव सहजच नजरेसमोर येते. १९८० पासून सतत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या या सुल्तानाचे शौकही शाहीच आहेत. १९९० मध्ये मायक्रोसॉफ्टच्या बिल गेटस यांनी त्याला श्रीमंतीत मागे टाकले असले तरी महागड्या कार्स, विमाने या बाबत आजही सुल्तानच आघाडीवर आहे. या सुल्तानाकडे पूर्णपणे सोन्यात मढविलेली ९५ कोटी रूपये किमतीची लिमोसीन कार आहे. इतकेच नाही तर त्याच्याकडे तब्बल ७ हजार महागड्या कार्स आहेत व सोन्याने मढविलेले विमानही.


१९९३ साली या सुल्तानाचे नाव गिनीज बुकमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंदविले गेले आहे. अनेक तेल खाणी त्याच्या मालकीच्या आहेत. त्याला बेंटलीच्या महागड्या कार्स फार आवडतात. कार ठेवण्यासाठी पाच विमाने बसतील इतक्या मोठ्या गॅरेजची सोय केली गेली आहे व त्यात ७ हजार कार पार्क केलेल्या आहेत. या कार्सची किंमत ५ अब्ज डॉलर्स आहे. यात ६०० मर्सिडीज, २० लोम्बार्गिनी, ६०० रोल्स रॉईस, ४५२ फेरारी, १७९ जग्वार, २०९ बीएमडब्ल्यू, ३८२ बेंटली, ५७४ मर्सिडीज बेंझ व सोन्याने मढविलेले बोईंग विमान यांचा समावेश आहे.

या सुल्तानाचा महालही आलिशान असून त्यात १७८८ खोल्या आहेत. महालाचे सिलींग सोन्याचे आहे. हे जगातील सर्वात महागडे घर मानले जाते.

Leave a Comment