नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीसह भारतातील प्रमुख शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढले आहे. यामुळे नागरिकांना आरोग्यासह इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन हीरो इलेक्ट्रीकने बाजारात नवीन इको-फ्रेंडली स्कूटर Flash लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे इको-फ्रेडली स्कूटर हे नाममात्र सायकलच्या किंमतीत मिळणार असून तिची किंमत फक्त 19,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे.
ही स्कूटर खास करून त्या ग्राहकांसाठी बनविण्यात आली आहे जे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार करत आहेत आणि पहिल्यांदाच ई-व्हिकल खरेदी करणार आहेत.
सायकलच्या किंमतीत हीरोची स्कूटर
नवीन फ्लॅश ही दोन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून तिला एकदा चार्ज केल्यानंतर 65 कि.मी.पर्यंत धावू शकते. या स्कूटरमध्ये 250 वॉटची मोटार असून त्यात 48 2÷तिे ची बॅटरी आहे. ही बॅटरी पूर्णपणे शॉर्ट शर्किट प्रोटेक्शन लैस आहे. तसेच स्कूटरच्या सीटच्या खालील भागात स्टोरेज कंपार्टमेंटचीही सुविधा देण्यात आली आहे.
अत्याधुनिक मॉडेल असलेली फ्लॅश वजनाने एकदम हलकी असल्याने तिचा वेगही अधिक असणार आहे. या स्कूटरचे फक्त 87 किलो वजन आहे. यात मॅग्नेशियम अलॉय व्हील, टेलीस्कोपिक सस्पेंशन आणि फुल बॉडी क्रॅश गार्ड आहेत.