कुठल्याही हॉटेलमध्ये गेले तर तेथील क्रोकरी कशी आहे याकडे सहजच लक्ष जाते. बहुतेक हॉटेल आपले पदार्थ अधिक चांगल्या तर्हेशने सर्व्ह करता यावेत व ग्राहकांच्या तोंडाला पदार्थाच्या प्रथमच दर्शनातच पाणी सुटावे यापद्धतीने ते सर्व्ह करत असतात. सॅन फ्रान्सिस्कोमधील एका खास रेस्टॉरंटमध्ये चक्क आयपॅडवर पदार्थ सर्व्ह केले जातात. या रेस्टॉरंटचे नांव आहे क्वीन्स रेस्टॉरंट
येथे आयॅपडवर सर्व्ह होतात पदार्थ
येथे अ डॉग इन सर्च ऑफ गोल्ड या नावाचा पदार्थ आयपॅडवर सर्व्ह केला जातो. त्यापूर्वी तुम्हाला एक व्हिडीओ दाखविला जातो. त्यात कुत्री गोल्ड सर्च करत असताना दिसतात. हा पदार्थ सर्व्ह करण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये २० आयपॅडस ठेवली गेली आहेत.व पदार्थाची किमत आहे २०० डॉलर्स. पदार्थ सर्व्ह करताना खास बॉक्समध्ये आयपॅड ठेवले जाते मात्र पदार्थ व आयपॅड एकमेकांना टच करत नाहीत. अर्थात अशी आयपॅड डिश देणारे हे पहिले हॉटेल नाही. यूकेमध्यही या प्रकारे आयपॅडवर पदार्थ सर्व्ह करणारे एक हॉटेल आहे. तेथे तर थेट आयपॅड प्लेटप्रमाणे वापरून पदार्थ दिला जातो. म्हणजे आयपॅड व पदार्थ यांच्यामध्ये कोणतेही लेअर नसते.