नवी दिल्ली – वेगवेगळ्या शहरांत डेटा नेटवर्क(मोबाईल इंटरनेट)साठी फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड रिसर्च फर्म क्रेडिट स्विस एक्विटी रिसर्च यांनी केलेल्या सर्वेक्षणात रिलायन्स जिओचे नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचे समोर आले आहे.
नेटवर्कमध्येही रिलायन्स जिओ अव्वल
३० शहरांत या संस्थेने केलेल्या अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला आहे. सर्वेक्षणानुसार ८० टक्के शहरांत रिलायन्स जिओ नेटवर्कचे कव्हरेज चांगले आहे. तर इतर कंपन्यांचे नेटवर्क कव्हरेज फक्त ३० टक्के शहरांत चांगल्या श्रेणीत दाखवण्यात आले आहे. या संस्थेने राज्यांच्या राजधानींसह इतरही शहरांत नेटवर्क कव्हरेज आणि स्पीडचे मूल्यमापन केले आहे. त्यामुळे ४जी नेटवर्कमध्ये जिओ सर्वात प्रगल्भ आणि पुढे असून, इतरही कंपन्यांना त्याच्या श्रेणीत येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
तसेच ४जी नेटवर्कच्या स्पीडमध्ये एअरटेल सर्वाधिक म्हणजे १२ एमबीपीएस स्पीडने पुढे आहे. त्याच्या तुलनेत व्होडाफोन, आयडिया आणि रिलायन्स जिओचा स्पीड ७ ते ८ एमबीपीएसच्या दरम्यान आहे. मात्र सध्याच्या घडीला देशात ९० टक्क्यांहून अधिक लोक जिओ नेटवर्क वापरत असल्याने जिओचा स्पीड सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे.