नवी दिल्ली – आगामी पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुकवर खास दोन टूल्स सुरू करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर या राज्यांमधील 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयवर्षे असलेल्या यूजर्सला पोलिंग डे रिमाइंडर देण्यात येणार आहे. हे रिमाइंडर मतदारांना आठवण करून देण्यात येणार आहे की, आज मतदान आहे आणि आपल्याला मतदान करणे आवश्यक आहे.
आता मतदारांसाठीही फेसबुकवर खास टूल्स
फेसबुकने हे रिमाइंडर्स निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाशी लिंक केले आहे. ज्याच्या मदतीने फेसबुक युजर्स पोलिंग बुथ आणि मतदानासंबंधातील अन्य माहिती मिळवू शकतो. तसेच मतदान केल्यानंतर युजर्स Share You Voted बटनवर क्लिक करून आपल्या मित्रांनाही मतदान केल्याचे सांगू शकणार आहेत. मात्र, यात आपण कोणाला मतदान केले ते सांगता येऊ शकणार नाही.
दुसरा टूल निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांसाठी आणि निवडून येणार्या उमेदवारांसाठी आहे. यामध्ये उमेदवार 200 शब्दांमध्ये आपल्याबद्दल माहिती किंवा विविध विषयांवर आपले मत मांडू शकतो. मात्र, या टुलमध्ये दिलेल्या 20 विषयांबाबतच उमेदवार आपले मत मांडू शकतो. यात अर्थसंकल्प, शिक्षण, आरोग्य आणि विकास आदी विषय आहेत.
फेसबुकने सर्वात पहिल्यांदा 2008मध्ये अमेरिकाच्या निवडणूकीत इलेक्शन डे रिमांडर (I’m a Voter) सुविधा उपलब्ध करून दिली होती. या दिवशी लोकांना आज मतदान असल्याची आठवण करून देण्यात आली होती.