७.५ लाखांपर्यंत करमाफ; सेव्हिंगचा नवीन फॉर्मुला


नवी दिल्ली – सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर न आकारल्याने पर्सनल इनकम टॅक्सधारकांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच, जर आपण योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास आपल्याला साडे सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. आम्ही तुम्हाला 7.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नांवर लागणार्‍या करातून सूट मिळण्यासाठी कोणते क्लेम करावे याबाबत माहिती देणार आहे.
3 लाखांपर्यंत कोणता कर नाही

याबाबत चीफ एडिटर आणि सीए प्रीती खुराना यांनी सांगितले की, नवीन कर रचनेनुसार 3 लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना 5 टक्के कर भरावा लागणार आहे. यातील 2.5 लाखांवरील वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. म्हणजे वार्षिक 3 लाख उत्पन्नापैकी फक्त 50 हजार रुपयांवर कर भरावा लागेल. यावर 5 टक्के कर आकारणीनुसार अडीच हजार रुपये होतात. मात्र, वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपये असल्यास अडीच हजार रुपयांची सुट मिळते. यामुळे तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असतानाही तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

80-सी नुसार 1.5 लाखांच्या गुंतवणूकीवर सुट…
तुम्ही 80-सी नुसार दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर करातून सवलत मिळवू शकता. 80-सीच्या अंतर्गत तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड, जीवन विमा आणि मेडिकल क्लेममध्ये दीड लाखांपर्यत गुंतवणूक करू शकता.

एनपीएसमधील 50 हजारांच्या गुंतवणूकीवर सुट…
न्यू पेंशन सिस्टम म्हणजे एनपीएसमध्ये 50 हजारांच्या गुंतवणूकीवर कोणताही कर आकारल्या जात नाही.

2.5 लाखांच्या गृहकर्जावर कर सवलत…
जर तुम्ही गृह कर्ज घेतले असल्यास तुम्हाला गृह कर्जाच्या व्याजावर 2 लाखांपर्यंतची कर सवलत मिळते. यासाठी आपण ते घर ताब्यात घेतलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पहिल्यांदा घर घेतले असेल तर 2.5 लाखांपर्यतच्या व्याजावर तुम्हाला कर सवलत मिळू शकते.
प्रीति खुराना यांच्या मते, साडे सात लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील कर वाचविण्यासाठी या गुंतवणूकीचा पर्याय नोकरदार आणि छोटे व्यावसायिक अवलंब करू शकतात. याप्रकारे गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5 लाखापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

Leave a Comment