हिंदमहासागराच्या तळाशी आहे‘हरवलेला खंड’


हिंद महासागरातील मॉरीशस या बेटाच्या तळाशी असलेला बेट हा‘हरवलेले खंड’ असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. मादागास्कर या बेटापासून तुटून वेगळ्या झालेल्या प्राचीन प्राचीन खंडाचा हा छोटा भाग असावा. गोंडवाना हा महाखंड तुटून पडल्यावर कदाचित तो तिथे राहून गेला असावा, असे त्यांचे मत आहे.

गोंडवाना या खंडाच्या तुटण्याची प्रक्रिया 20 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली होती. अफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे वेगवेगळे झाले आणि हिंद महासागराची निर्मिती झाली, तेव्हाची ही घटना असावी, असे म्हटले जाते.बेटावरील ज्वालामुखीच्या स्फोटातून निघालेल्या लाव्हाने या खंडाला नंतर झाकून टाकले होते.

‘‘आम्हीया खंडांच्या तुटण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करत आहोत जेणेकरून पृथ्वीचा भूगर्भीय इतिहास जाणून घेता येईल,’’ असे दक्षिण अफ्रिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ विटवाटर्सरेंडचे प्रोफेसर लेविस ऐशवाल म्हणाले.

उन्होंने बताया, ‘‘मॉरीशस हे एक बेट आहे आणि तेथील एकही खडक 90 लाख वर्षांपेक्षा जुना नाही. मात्र या खंडावरील खडकांच्या अभ्यासातून आम्हाला जाणवले, की तेथील जिरकन हे खनिज तीन अब्ज वर्षे जुने आहे.’’ जिरकन हे खनिज खंडावरील ग्रॅनाईटमध्ये सापडते. यात यूरेनियम, थोरियम आणि शिशे यांचे कण सापडतात.

Leave a Comment