भविष्य चुकल्याने ज्योतिषाला बेड्या


श्रीलंकेतील ज्योतिषी विजिथा रोहाना याला त्याचे भविष्य चुकल्यामुळे जेलची हवा खावी लागली आहे. हा रोहाना श्रीलंकेत चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याने श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांना गेल्या महिन्यात मृत्यूयोग असल्याचे भविष्य वर्तविले होते. सिरीसेना याना अपघात, घातपात वा आजारात मृत्यू येईल असे त्याने सांगितले होते व २७ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू होईल असेही भविष्य वर्तविले होते. आता त्याने ही तारीख वाढवून २७ आक्टोबर केली असली तरी त्याला तुरंगात टाकले गेले आहे.

रोहाना पूर्वी सैन्यात होता. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या डोक्यावर ते श्रीलंकेत गार्ड ऑफ ऑनर घेत असताना बंदुकीच्या दस्त्याने वार करणारा हाच सैनिक होता. राजीव गांधी या हल्ल्यातून बालंबाल बचावले होते. त्यानंतर तो कांही काळ तुरूंगात होता. मात्र सध्या तो श्रीलंकेतील प्रसिद्ध ज्योतिषी बनला आहे.

Leave a Comment