टोयोटाला मागे टाकून व्होक्सवॅगन जगात नंबर वन


जपानी कारमेकर टोयोटोला प्रथमच मागे टाकत जर्मन कारमेकर कंपनी व्होक्सवॅगनने जगात सर्वाधिक कार विकण्याचा विक्रम नोंदविताना जगातील नंबर वन कंपनीचे स्थान हस्तगत केले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार टेायोटोने २०१६ मध्ये १ कोटी २ लाख कार विकल्या आहेत तर व्होक्सवॅगनने १ कोटी ३१ लाख कार्स विकल्या आहेत. अर्थात जनरल मोटर्सचे आकडे अजून प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.

वास्तविक एमिशन टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे व्होक्सवॅगनच्या प्रतिष्ठेला चांगलाच धक्का बसला होता तरीही त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. गेली चार वर्षे सतत सर्वाधिक कार विकण्यात टेायोटो यशस्वी ठरली होती. २०१५ च्या तुलनेत टोयोटोने २०१६ मध्ये अधिक कार विकल्या आहेत मात्र व्होक्सवॅगनने टोयेाटोपेक्षा अधिक कार्स विकण्यात यश मिळविल्याने ही कंपनी प्रथम क्रमांकावर आली आहे.

Leave a Comment