महिंद्राची लाँच केली नवी केयुव्ही १००


नवी दिल्ली : आपली नवी केयुव्ही १०० ही कार भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध एसयूव्ही कार निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने नुकतीच लाँच केली आहे. या नव्या कारची दिल्ली एक्स-शोरुम किंमत ६ लाख ३७ हजार रुपये असणार आहे.

कंपनीकडून या कारबरोबरच के६ आणि के६ प्लस मॉडेलही लाँच करण्यात आले आहे. ही कार लाल आणि सिल्व्हर या कलरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटोमोटिव्ह) प्रवीण शाह यांनी सांगितले, कंपनीच्या कारला एक वर्ष पूर्ण झाल्याने आम्ही ग्राहकांचे आभारी आहोत. केयुव्ही १०० या नव्या कारमध्ये विशेष असे फिचर्स देण्यात आले आहे. ही कार कॉम्पॅक्ट कारसारखी काम करणार आहे.