इंटेक्सचा अॅक्वा अमेझ प्लस भारतात


इंटेक्सने त्यांचा अॅक्वा अमेझ प्लस हा फोर जी व्होल्ट स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या फोनची किंमत ६२९० रूपये असून तो राखाडी, ब्लॅक व निळ्या रंगात उपलब्ध करून दिला गेला आहे.

या फोनसाठी ४.७ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, अँड्राईड ६.० मार्शमेलो ओएस, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी व ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. रियर व फ्रंट दोन्ही कॅमेरे ५ एमपीचे आहेत व फोनला २ हजार एमएएच बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी फोर जी, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी सपोर्ट अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment