आयटी रिटर्न मुदतीत न भरल्यास दंड


नवी दिल्ली – सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी छोट्या करदात्यांना दिलासा देत सांगितले की, पहिल्यांदा आयटी रिटर्न भरणार्‍यांना एका वर्षापर्यंत स्क्रुटिनीमध्ये सुट मिळणार आहे. तसेच 5 लाखांपर्यत उत्पन्न असणारे करदाता केवळ एका पानाचा अर्ज भरून आयटी रिटर्न भरू शकणार आहेत. मात्र, आयटी रिटर्न मुदतीन न भरल्यास त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

अर्थमंत्री जेटली म्हणाले, आयटी रिटर्न भरणार्‍यांनी दिलेल्या मुदतीत रिटर्न न भरल्यास त्यांना विलंब शूल्क म्हणून पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच 31 डिसेंबरनंतर आयटी रिर्टन भरल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. मात्र, 5 लाखांहून कमी वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना दिलासा देण्यात आला आहे. त्यांना जास्तीत जास्त 1 हजार रुपये विलंब शूल्क आकारण्यात येणार आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशातील जीडीपीच्या तुलनेत जमा होणारा करा हा खूपच कमी आहे. असंघटीत क्षेत्रात सुमारे 4.2 कोटी मजूर काम करतात त्यापैकी फक्त 1.74 कोटी नागरिकच कर भरतात. असंघटीत क्षेत्र आणि छोट्या उद्योग करणार्‍या 5.6 कोटी नागरिकांमधील फक्त 1.81 कोटी नागरिक कर भरण्यात येतो. चांगला सुविधा आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी करदात्यांनी वेळेत कर भरणे आवश्यक आहे, असे जेटली यांनी सांगितले.

Leave a Comment