रेल्वेच्या ऑनलाइन तिकिटांवर सेवा कर नाही


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१९ पर्यंत देशातील सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये बायो टॉयलेट सुरु केले जातील अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आगामी पाच वर्षांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा निधीअंतर्गत आगामी पाच वर्षात १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटन आणि यात्रेच्या एक्सप्रेस गाड्या सुरु करणार असून या पुढे ई तिकिट काढल्यास सेवा कर आकारला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. नवीन मेट्रो रेल धोरण तयार झाले असून यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.

Leave a Comment