मोटो जी ५ ची फिचर्स लिक


लेनोवो त्यांच्या नव्या मोटोजी ५ व फाईव्ह प्लस स्मार्टफोनचे लॉचिंग बार्सिलोनातील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस अगोदरही करू शकते अशी बातमी असून ब्राझील मधील वेबसाईटने मोटो जी ५ व प्लस ची फिचर्स लिक केली आहेत. टेक्नोब्लॉगच्या माहितीनुसार ब्राझीलमध्ये हे फोन एक्सटी १६७२ कोडनेमने लीक झाले आहेत.

लिक झालेल्या माहितीनुसार हे दोन्ही अँड्राईड ७.० नगेट ओएसवर चालतील. मोटो जी फाईव्हसाठी ५ इंची फुल एचडी स्क्रीन, २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती १२८ जीबी पर्यंत वाढविता येण्याची सुविधा, स्नॅनड्रॅगन ४३० प्रोसेसर, १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल तर मोटो जी फाईव्ह प्लससाठी ५.५ इंची डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, १२एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा ३१०० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment