तुम्ही बघितली आहे का जगातील सर्वात महागडी बाईक


स्वित्झर्लंड : नुकतीच स्वित्झर्लंडची कंपनी फिलाईन मोटारसाइकल्सने आपली हायटेक डिलक्स बाईक ‘फिलाईन वन’ लॉन्च केली असून जगातील सर्वात महाग बाईक या बाईकला म्हटले जात आहे. फिलाईन वनची किमत २,८० हजार डॉलर म्हणजे (सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये) आहे. आतापर्यंत कंपनीने केवळ ५० बाइक्स तयार केल्या आहेत.

सर्वात उच्चतम गुणवत्ता असलेले कार्बन, टायटेनियम, एरोस्पेस अॅल्युमिनिअम आणि उत्तम क्लॉलिटीच्या चामड्याचा वापर फिलाईन वन तयार करण्यासाठी केला आहे. ही बाइक बनविण्यासाठी चार वर्ष संशोधन करण्यात आले. या बाइकमध्ये तीन सिलेंडरवाला ८०१ सीसी पॉवरचे इंजिन आहे. ६ स्पीड गिअर बॉक्स आहे. जो १७० बीएचपी पॉवर देतो. याचे वजन १५५ किलोग्रॅम आहे. फेनाइल वनचे पहिले मॉडल २०१७ च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च होणार आहे.

Leave a Comment