आयकर विभागाचा १८ लाख खात्यांवर सर्जिकल स्ट्राईक?


नोटबंदी नंतर मोठ्या रकमांची देवघेव केली गेलेली व जे व्यवहार कर विवरणाशी जुळत नाहीत अशी १८ लाख संशयास्पद खाती आयकर विभागाने वेगळी केली असल्याचे व त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे आयकर विभागाने जाहीर केले आहे. ऑपरेशन क्लिन मनी म्हणजे स्वच्छ धन अभियान अंतर्गत ही मोहिम हाती घेतली गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर या खात्यातून मोठ्या रकमांचे व्यवहार केले गेले आहेत मात्र त्याची माहिती दिली गेलेली नाही. या खात्यांची पुर्नपडताळणी पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी ती ऑनलाईन केली जाणार आहेत. प्रत्येक पॅनकार्डधारक कर विवरणाचे ई फायलिंगग करण्यासाठी या पोर्टलचा वापर करून माहिती पाहू शकणार आहे. महसूल सचिव हसमुख अधिया म्हणाले यासाठी विशेष सॉफटवेअरचा वापर केला जात आहे. स्वच्छ धन अभियानासाठीच हे सॉफ्टवेअर तयार केले गेले आहे

जी खाती संशयास्पद म्हणून वेगळी काढली गेली आहेत, त्या लोकांना आयकर विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत व त्यांच्याकडून उत्तरे आल्यानंतर गरजेनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या पडताळणीत सुरवातीला पाच लाख वा त्यापेक्षा जास्त डिपॉझिट करणारे तसेच ३ ते ५ लाखांचे संशयास्पद व्यवहार करणार्‍या नागरिकांची खाती तपासली गेली आहेत. नोटबंदी नंतर सात आठवड्यांच्या काळात १ कोटी खात्यात २ लाखांपेक्षा जास्त कॅश जमा केली गेली असून त्यातील ७० लाख खाती पॅन अॅडॅच्ड आहेत.

Leave a Comment