नवी दिल्ली – सरकारने अर्थसंकल्पातून नोटाबंदीची सर्वाधिक झळ बसलेल्या शेतकऱ्यांसाठी भरभरून तरतुदी केल्या असून अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प; शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटींची तरतूद
देशातील कृषिक्षेत्राचा विकासदर नव्या आर्थिक वर्षात ४.१ टक्के इतका असेल. शेतक-यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतक-यांचे उत्पन्न पाचवर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. पीक विम्यासाठी ९ हजार कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षात मान्सून चांगला झाल्याने यावर्षी चांगली पिके येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.