नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. ग्राम सडक योजनेसाठी १९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी ४८७८ कोटींची तरतूद करण्यात आली असून २०१८ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे उद्देश असल्याचे जेटलींनी सांगितले.
अर्थसंकल्प; मनरेगासाठी ४८ हजार कोटींची तरतूद
२०१७-१८ वर्षामध्ये मनरेगासाठी ४० हजार कोटींवरुन तरतूद ८ हजार कोटींनी वाढवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिवाय ग्रामविकासासाठी ३ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ग्रामी भागातील विजेसाठी ४५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यांसाठी २०१९पर्यंत १ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून यासंदर्भात १५ हजार कोटींवरुन २३ हजार कोटींपर्यंत तरतूद वाढवण्यात आली आहे.