यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांचे योगदान अधिक


नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून दरवर्षी सादर करण्यात येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. मात्र, तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, यावर्षी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात पूर्वीच्या तुलनेत यावेळी महिलांची भागीदारी जास्त आहे. अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांमध्ये 41 टक्के या महिला आहेत. ज्यांच्याकडे एकूण अर्थसंकल्पाशी संबंधीत 52 टक्के काम सोपविण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध केंद्रीय मंत्रालय आणि विभागातील अतिरिक्त सचिव व संयुक्त सचिव स्तरावरील 34 सल्लागारांपैकी 14 महिला सल्लागार आहेत. या महिला अधिकारी अर्थसंकल्पाशी संबंधीत 52 टक्के कामकाज सांभाळत आहेत.

केंद्रीय मंत्रालयातील महत्त्वाचे विभाग असलेल्या अर्थ, स्वास्थ आणि कुटुंब कल्याण, मानव संसाधन विकास आणि क्रीडा विभागाच्या अर्थ सल्लागारांनी या अर्थसंकल्पाच्या पूर्व प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय वाहतूक प्राधिकरण, शहरी विकास, रसायन आणि उर्वरक, कोसळा आणि खान, पोस्ट, सामाजिक न्याय, विज्ञान आणि औद्योगिक अनुसंसाधन मंत्रालय आदी विभागातील अधिकार्‍यांचाही अर्थसंकल्पात सहभाग आहे.

अर्थसंकल्प सादर करण्याच्या पूर्ण प्रक्रियेत मंत्रालयाच्या विविध खात्यातील सल्लागारांचे प्रमुख दायित्व असते. अर्थमंत्री अरुण जेटली एक फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पासंदर्भात नोव्हेंबरपासूनच विविध मंत्रालय आणि विभागांशी चर्चा सुरू करण्यात आली होती.

Leave a Comment