स्वाईपचा एलिट पॉवर स्मार्टफोन हप्त्यावर मिळणार


कमी किमतीत शानदार फिचर्सचे स्मार्टफोन देणार्‍या स्वाईप ने त्यांचा नवा स्मार्टफोन स्वाईप एलिट पॉवर नावाने सादर केला असून आजपासून म्हणजे ३१ जानेवारीपासून तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी आहे. या फोनची किंमत ६९९९ रूपये आहे मात्र ग्राहक फ्लिपकार्टवर तो दरमहा ३४० रूपये ईएमआयनेही घेऊ शकणार आहेत.

या फोनसाठी ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज ते कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ८एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ४००० एमएएच ची बॅटरी हायब्रिड स्लॉट दिला गेला आहे. फास्ट प्रोसेसर व पॉवरफुल बॅटरीमुळे हा फोन हँग होणार नाही असा कंपनीचा दावा आहे. हा फोरजी फोन असून थ्रीजी, टूजी आॅप्शन्सही दिली गेली आहेत.

Leave a Comment