या कारमध्ये आहे हेलिपॅड


जगातील सर्वात लांबीची कार किती मोठी असेल हे जाणून घ्यायचे असेल तर या कारची माहिती घ्यायला हवी. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण जगात सर्वाधिक लांबीची कार आहे द अमेरिकन ड्रीम नावाची. या कारची लांबी चक्क १०० मीटर असून तिला २६ चाके आहेत. विशेष म्हणजे या कारच्या आतमध्ये हेलिपॅड आहे व तेथे हेलिकॉप्टर उतरू शकते. कारची किंमत आहे २७.१ कोटी.

या लिमोसीन कारचे डिझाईन प्रसिद्ध डिझायनर जे ओरबर्ग याने केले आहे. ही कार कस्टमाईज्ड आहे म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार बनविली गेली आहे. या कारमध्ये स्विमिंग पूल, मेाठा बेड आहेच पण इंटिरियर एलरी हॉटेलप्रमाणे आहे. पैसे जास्त असतील तर आपणही मर्सिडीजपासून हमरपर्यंत कोणत्याही कारची लिमोसीन बनवू शकतो. लिमोसिन हा कारचा ब्रँड नाही तर कारचा प्रकार आहे. फक्त ग्राहकाच्या ऑर्डरनुसार त्या बनविल्या जातात व त्यांचे डिझाईन पूर्णपणे ग्राहकाच्या वैयक्तीक गरजांनुसार तयार केले जाते. इंडिरियरही कस्टमाईज्ड असते व ते बदलता येते. या कारचे डिझाईन कार ब्रँडनुसार न करता लग्झरी नुसार केले जाते.

1 thought on “या कारमध्ये आहे हेलिपॅड”

Leave a Comment