अमेरिका व यूके मध्ये कार्यरत असलेल्या दिग्गज भारतीय आयटी कंपन्यांनी जगातील अन्य देशांच्या बाजाराकडे आपली नजर वळविली असून त्यांचे मुख्य लक्ष्य चीन व जपानकडे असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत ट्रंप यांच्या संरक्षणवादी धेारणांमुळे भारतीय कंपन्यांत स्लो डाऊनची लक्षणे दिसू लागली आहेत अशा परिस्थितीत केवळ यूएस व युकेवर असलेले अवलंबित्व कमी करण्याचे धोरण भारतीय आयटी कंपन्यांनी ठेवले आहे.
भारतीय आयटी कंपन्या जपान चीनकडे?
सॉफ्टवेअर सर्व्हीस कंपन्यांची राष्ट्रीय संस्था नॅस्कॉम व भारताचे महावाणिज्य दूतावास यांनी शांघायमध्ये भारतीय व चीनी आयटी कंपन्यांतील व्यापार वाढी संदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.नॅस्कॉमचे ग्लेाबल ट्रेड प्रमुख गगन सभरवाल यांनी यावेळी बोलताना यूके यूसवरील अवलंबित्व भारतीय कंपन्यांनी कमी करण्याची गरज व्यक्त केली तसेच चीन व जपान या बड्या अर्थसंस्था असलेल्या देशांकडे नजर वळवून तेथे नवीन संधी शोधल्या जाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.