हा स्मार्टफोन साबणाने धुतल्यावरही चालणार


नवी दिल्ली : आपण नवा कोरा स्मार्टफोन घेतल्यावर त्याची चांगलीच काळजी घेतो. त्याला पाण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, स्मार्टफोन एकदा का पाण्यात पडला तर तो खराब होतो. त्यामुळे Kyocera या स्मार्टफोन कंपनीने ही गरज लक्षात घेऊन आपला Rafre हा नवा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोनला साबणाने धुतले तरीदेखील काम करु शकणार आहे.

हे विशेष असे फिचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्याने स्मार्टफोनप्रेमींसाठी एक महत्त्वाची बाब असणार आहे. हा स्मार्टफोन स्वच्छ ठेवता यावा, यासाठी कंपनीकडून हे नवे फिचर्स देण्यात आले आहे. तसेच या स्मार्टफोनला MIL-STD-810G, IPX5, IPX8 आणि IPX5 रेटिंग देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटर, डस्ट आणि शॉक रेसिस्टेंटचे फिचर्स देण्यात आले आहे. 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment